फलटण: Phaltandiary.com आणि Bansal Classes यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खास ऑनलाइन स्पर्धेत सोमंथळी येथील योगेश सोनवणे यांनी बाजी मारत ₹१०,००० किमतीचे टायटन घड्याळ जिंकले आहे.
Phaltandiary.com च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर काही दिवसांपूर्वी एक विशेष रील अपलोड करण्यात आली होती. या रीलमध्ये स्पर्धेसाठी एक गुप्त OTP तयार करून तो लपवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. हा OTP शोधणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक गिफ्ट देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
ही रील पाहताच योगेश सोनवणे यांनी तत्काळ सोमंथळी येथून शोधमोहीम सुरू केली. विविध ठिकाणी शोध घेत अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्यांनी तो लपवलेला OTP शोधून काढला आणि स्पर्धेचे विजेते ठरले.
सोमवार दिनांक १८ मे २०२६ रोजी बन्सल Classes येथे आयोजित कार्यक्रमात Phaltandiary.com व बन्सल Classes यांच्या तर्फे योगेश सोनवणे यांना ₹१०,००० किमतीचे टायटन कंपनीचे आकर्षक घड्याळ भेट देण्यात आले.
या उपक्रमामुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा नाविन्यपूर्ण स्पर्धांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दोन्ही रील तुम्ही येथे पाहू शकता.
१. OTP लपवून ठेवल्याची रील.
२. विजेते घोषित केल्याची रील.





